Granth Sangat · ग्रंथसंगत
पुस्तक वाचण्याआधी, पुस्तकाच्या प्रेमात पडूया.
माणूस ज्या संगतीत राहतो, तसा घडतो. Granth Sangat मध्ये उत्तम पुस्तकांचं रसग्रहण आणि त्यांची सौंदर्यस्थळं, मराठीतून, audio स्वरूपात.
MetaGurukul · मुलांच्या बौद्धिक जडणघडणीसाठी
जग समजणं, स्वतः विचार करणं, आपले विचार स्पष्ट मांडणं, आत्मविश्वासाने उभं राहणं, या गोष्टी परीक्षेत मोजल्या जात नाहीत, पण आयुष्यात त्याच कामी येतात. MetaGurukul मुलांमध्ये हेच घडवतं, शांतपणे, सातत्याने आणि योग्य mentorship सोबत.
आमचा विश्वास
सक्षम व्यक्ती कशी ओळखायची? तिला जगाची जाण असते. ती प्रश्न विचारते, स्वतः विचार करते, आपले विचार स्पष्ट मांडते आणि आपल्या मूल्यांशी घट्ट असते.
हे गुण कोणत्याही एका परीक्षेच्या तयारीत येत नाहीत. ते बालपणापासून हळूहळू घडतात, गोष्टींतून, वाचनातून, संवादातून आणि योग्य मार्गदर्शनातून.
पूर्वी हे काम घर, एकत्र कुटुंब आणि गुरुकुल करत असत. आज बहुतेक मुलांना हे घडवणं systematically मिळत नाही.
MetaGurukul त्याच परंपरेचं आधुनिक रूप आहे.
आमचा दृष्टिकोन जाणून घ्यातीन programs, उद्देश एकच, मुलांचं मन घडवणं.
UPSC ची तयारी पदवीनंतर नाही, शाळेपासून सुरू होते.
हे coaching नाही, हा पाया आहे. जागरूकता, विचारशक्ती, communication, आत्मविश्वास आणि शिस्त, शाळेच्या अभ्यासावर ताण न आणता, आत्तापासून.
पुस्तक वाचण्याआधी, पुस्तकाच्या प्रेमात पडूया.
माणूस ज्या संगतीत राहतो, तसा घडतो. Granth Sangat मध्ये उत्तम पुस्तकांचं रसग्रहण आणि त्यांची सौंदर्यस्थळं, मराठीतून, audio स्वरूपात.
जगाची जाण वाढवणारं ज्ञानवर्तुळ
इतिहास, संस्कृती, जग आणि आजच्या घडामोडी, audio आणि live webinars मधून. मुख्यतः पालकांसाठी, जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठीही.
आमचा प्रत्येक program या पाच गोष्टी घडवण्यासाठी बनवलेला आहे.
जग, इतिहास, संस्कृती आणि आजच्या घडामोडी, आणि त्यांच्यातले संबंध समजणं.
प्रश्न विचारणं, तर्क लावणं आणि प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या बाजू पाहणं.
आपले विचार स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोलता व लिहिता येणं.
शिस्त, मूल्यं आणि आपल्या मुळांशी असलेलं नातं.
स्वतःहून शिकत राहण्याची ओढ, आयुष्यभर.
माहिती आज सगळीकडे आहे. मुलांना गरज आहे ती योग्य दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शकाची.
थोडं, पण नियमित. Weekend sessions आणि छोट्या सवयींमधून मोठा बदल, शाळेच्या अभ्यासावर ताण न आणता.
मुलं lecture मधून कमी आणि गोष्टींतून जास्त शिकतात. आणि गोष्टी येतात वाचनातून.
आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरा, आणि त्यासोबत संपूर्ण जगाची ओळख.
मूल घडवण्यात पालकांची भूमिका सर्वात मोठी असते. आम्ही ती भूमिका सोपी आणि अधिक परिणामकारक करतो.
तुमचे मार्गदर्शक
संस्थापक, Excellence IAS Academy, पुणे · Veteran UPSC Trainer · मार्गदर्शक, MetaGurukul
शिक्षण: M.A. (इतिहास) · M.A. (तत्त्वज्ञान) · M.A. (मराठी साहित्य)
तत्त्वज्ञान, इतिहास आणि साहित्याचे प्रगाढ अभ्यासक असलेले कुलदीप सर गेली २० हून अधिक वर्षं UPSC चे विद्यार्थी घडवत आहेत. YASHADA, BARTI आणि SIAC सारख्या महाराष्ट्रातील शासकीय UPSC प्रशिक्षण संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन केलं आहे.
१०,००० हून अधिक पुस्तकांचं वाचन, साहित्याची सखोल जाण आणि भारतीय संस्कृती व इतिहासावरचं प्रभुत्व, यामुळे सरांचं मार्गदर्शन ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलं आहे. गोष्टींतून विचार मांडण्याची त्यांची शैली विद्यार्थी आणि पालक दोघांच्याही मनात घर करते.
हजारो UPSC aspirants सोबत काम करताना सरांना एक गोष्ट सतत जाणवली, जागरूकता, विचारशक्ती, स्पष्ट अभिव्यक्ती आणि वाचनाची सवय या गोष्टी परीक्षेच्या शेवटच्या वर्षांत घडत नाहीत. त्या लहानपणापासून घडवाव्या लागतात.
हाच अनुभव MetaGurukul चा पाया आहे, UPSC च्या वर्गात जे उशिरा शिकवावं लागतं, ते शाळेपासूनच घडवणं.
“ज्ञान माणसाला मोठं करतं, पण त्या ज्ञानाचं बीज लहानपणीच मनात रुजायला हवं. MetaGurukul त्याच बीजारोपणासाठी आहे.”श्री. कुलदीप कोटंबे सर
महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांमध्ये कुलदीप सरांची व्याख्याने आणि संवाद





जिजाऊंनी शिवबांना गोष्टींतून स्वराज्याचं स्वप्न दिलं. बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणाला आणि वाचनाला पाठबळ दिलं. डॉ. कलामांनी आपल्या घडणीचं श्रेय नेहमी आपल्या साध्या, संस्कारी घराला दिलं.
इतिहास एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, मूल घरात घडतं. पालक हेच पहिले गुरु.
पण आजच्या धावपळीत वेळ कमी आहे, आणि मुलांसमोर काय ठेवावं हा प्रश्न मोठा आहे. MetaGurukul तुमची जागा घेत नाही, तुमच्या सोबत चालतं.
कुलदीप सरांच्या sessions नंतर माझा मुलगा बातम्या फक्त पाहत नाही, त्यावर प्रश्न विचारतो. जेवताना आमच्या घरात आता वेगळ्याच विषयांवर चर्चा होतात.
श्यामची आईचं रसग्रहण ऐकल्यानंतर मुलीने स्वतःहून ते पुस्तक मागितलं. वाचनाची सुरुवात इतकी सहज होईल, असं वाटलं नव्हतं.
प्रवासात ऐकायला सुरुवात केली. इस्रायल, बुद्ध, रामायण, मुलांना सांगण्यासाठी माझ्याकडे आता खूप गोष्टी आहेत.
प्रत्येक मूल वेगळं असतं. 1:1 Counselling Session मध्ये आम्ही तुमच्या मुलाला समजून घेऊ आणि त्याच्यासाठी योग्य मार्ग सुचवू.
WhatsApp वर बोला