MetaGurukul AppGranth Sangat · Knowledge Circle
उघडा
App Download Member Login
UPSC Foundation Program: नवीन batch साठी प्रवेश सुरू · 1:1 Counselling Session बुक करा

आमचा दृष्टिकोन

मुलांचं मन घडवण्याचा MetaGurukul मार्ग

आम्ही काय मानतो, कसं काम करतो आणि त्यातून मुलांमध्ये काय घडतं.

जे आयुष्य मोठेपणी मागतं, ते बालपणात घडतं.

जगाची जाण, स्वतंत्र विचार, स्पष्ट अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि शिस्त, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तीमध्ये हे गुण दिसतात. UPSC सारखी परीक्षा नेमके हेच गुण तपासते.

पण हे गुण शेवटच्या काही वर्षांच्या तयारीत तयार होत नाहीत. ते लहानपणापासून हळूहळू घडतात, गोष्टींतून, वाचनातून, संवादातून आणि योग्य मार्गदर्शनातून.

शाळा मुलांना अभ्यासक्रम देते. MetaGurukul मुलांना ही जडणघडण देतं.

मन घडवणारे पाच आयाम

  • जाणीव

    जग, इतिहास, संस्कृती आणि आजच्या घडामोडी, आणि त्यांच्यातले संबंध समजणं.

  • विचार

    प्रश्न विचारणं, तर्क लावणं आणि प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या बाजू पाहणं.

  • अभिव्यक्ती

    आपले विचार स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोलता व लिहिता येणं.

  • संस्कार

    शिस्त, मूल्यं आणि आपल्या मुळांशी असलेलं नातं.

  • जिज्ञासा

    स्वतःहून शिकत राहण्याची ओढ, आयुष्यभर.

आयामअर्थमुलामध्ये कसा दिसतो
जाणीवजग, इतिहास, संस्कृती आणि घडामोडी, आणि त्यांच्यातले संबंध समजणंबातमी ऐकून “हे का घडलं?” असा प्रश्न विचारतं
विचारतर्क लावणं, वेगवेगळ्या बाजू पाहणं, स्वतःचं मत तयार करणंऐकलेलं जसंच्या तसं न स्वीकारता त्यावर विचार करतं
अभिव्यक्तीविचार स्पष्टपणे बोलता आणि लिहिता येणंचर्चेत आत्मविश्वासाने आपलं मत मांडतं
संस्कारशिस्त, मूल्यं आणि आपल्या मुळांशी नातंआपल्या परंपरेचा अभिमान बाळगत, जगाकडे खुल्या मनाने पाहतं
जिज्ञासास्वतःहून शिकत राहण्याची ओढकोणी न सांगता पुस्तक हातात घेतं

आमची तत्त्वं

  • Mentorship, फक्त teaching नाही.

    माहिती सगळीकडे आहे. मुलांना गरज आहे दिशा दाखवणाऱ्या, त्यांना समजून घेणाऱ्या मार्गदर्शकाची.

  • दबाव नाही, सातत्य.

    थोडं, पण नियमित. मोठा बदल छोट्या, सातत्यपूर्ण सवयींतून घडतो.

  • गोष्टी आणि वाचनातून शिक्षण.

    मुलं lecture पेक्षा गोष्टींतून जास्त शिकतात. आणि गोष्टी येतात वाचनातून.

  • मुळांशी घट्ट, जगासाठी खुलं.

    आपला इतिहास आणि संस्कृती, आणि त्यासोबत संपूर्ण जगाची ओळख.

  • कसं विचार करायचं, काय विचार करायचा नाही.

    आम्ही मुलांना उत्तरं पाठ करायला नाही, तर प्रश्न विचारायला आणि वेगवेगळ्या बाजू समजून घ्यायला शिकवतो.

गोष्ट, उत्सुकता, वाचन, समज

प्रत्येक शिकण्याची सुरुवात एका चांगल्या गोष्टीतून होते. गोष्ट उत्सुकता जागी करते, उत्सुकता वाचनाकडे नेते, आणि वाचन समज वाढवतं.

पण आजच्या मुलांसाठी वाचनाची सुरुवात सगळ्यात अवघड आहे. म्हणूनच आम्ही आधी पुस्तकाच्या प्रेमात पडायला शिकवतो, आणि मग वाचायला.

पालक हेच पहिले गुरु.

जिजाऊंनी शिवबांना घडवलं, घरानेच कलामांना घडवलं. आजही मूल घरातच घडतं.

MetaGurukul पालकांची जागा घेत नाही. आम्ही पालकांना ज्ञान, दिशा आणि साथ देतो, जेणेकरून ते आपल्या मुलांच्या जडणघडणीत अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकतील.

आमचे programs हे कसं प्रत्यक्षात आणतात

Programजाणीवविचारअभिव्यक्तीसंस्कारजिज्ञासा
UPSC Foundation●●●●●
Granth Sangat●●
Knowledge Circle●●

तुमच्या मुलासाठी योग्य सुरुवात शोधूया.

मोफत Counselling Call